Pages

Monday 7 March 2016

GCompris

largegcomprislogo
GCompris Educational Software Suite
जी कॉम्प्री हे सॉफटवेअर अँड्रॉईड , मॅक, आय पॅड , लिनक्स, विंडोज या सर्व प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असून हे मोफत सॉफटवेअर आहे. 2 ते 10 वर्षातील मुलांसाठी यात अतिशय उपयुक्त असे विविध गेम्स व ॲक्टीविटीज आहेत. सध्या या सूट मध्ये एकूण 140 ॲक्टीविटीज असून मोफत व्हर्जन मध्ये 100 च्या जवळपास ॲक्टीव्हिटीज आहेत.
या सर्व ॲक्टीव्हिटीज खालील कॅटॅगरी प्रमाणे आहेत.
कॉम्प्यूटर डिस्कवरी
यात किबोर्ड , माऊस हाताळण्याची सवय व्हावी म्हणून ॲक्टीव्हीटीज आहेत.
ॲरीथमेटीक
यात टेबर मेमरी, गणनक्रिया , दुहेरी नोंद टेबल ( Double Entry Table), मिरर इमेज
विज्ञान
कॅनॉल लॉक , जलचक्र , पाणबुडी, इलेक्ट्रीक सिम्युलेशन इ.
भूगोल
या भागात जगाच्या नकाशात योग्य जागेवर देश ठेवणे असे खेळ
वाचन
यात वाचन सरावाचे खेळ
या खेरीज वेळ सांगायला शिकणे, वेगवेगळया चित्रांचे चित्रकोडे, व्हेक्टर ड्रॉईंग, कार्टुन तयार करणे, चेस, मेमरी गेम, कनेक्ट 4 , सुडोकू
असे विविध शैक्षणिक खेळ या सूट मध्ये आपणास मुलांसाठी मिळतील.
संगणकावरील व्हर्जन मध्ये मराठी भाषेतही काही खेळ भाषांतरीत केलेले आहेत.
लिनक्स या ओपन सोर्स प्रणाली मधील हा शैक्षणिक सूट अतिशय लोकप्रिय आहे. यातील खेळ आता अँड्रॉईड वर ही उपलब्ध झाल्यामुळे नक्की इन्स्टॉल करा
प्ले स्टोअर साठी लिंक
https://goo.gl/wLdTe7
विंडोज साठी लिंक
http://goo.gl/HOJkCI
मॅक साठी लिंक
https://goo.gl/36ZFQB
आय पॅड साठी लिंक
https://goo.gl/nlJpGJ

Augmented Reality / Virtual Reality

शिक्षणाच्या वारीच्या निमित्ताने स्टॉल लावायचाी संधी मिळाली होती त्या स्टॉल ला Augmented Reality व  Virtual Reality ( AR/ VR) अशी दोन्ही तंत्राज्ञाने‍ शिक्षणात कशी वापरता येईल आपण पाहिले.
ऑग्मेंटेड रिॲलिटी मध्ये AR या ॲप चा डेमो रंजीतने दाखवला तर VR  मध्ये 3डी व्हयूअर च्या साहयाने मंगळ वारीचा अनुभव अनेंकांनी घेतला असेल.
आता प्रश्न असा आहे की हे तंत्रज्ञान नेमके काय आहे. ? दोन्ही ऐच की वेगवेगळे?
वर्च्यअल रिॲलिटी म्हणजे तंत्रज्ञानाच्या साहयाने आभासी जगाची सफर घडविली जाते. बरेचदा यात डोम, 3डी डिस्प्ले अशा प्रकारचे हार्डवेअर वारले जाते. प्रेक्षक या हार्डवेअर च्या मदतीने वेगळाच अनुभव घेत असतो. बरेचदा हा अनंभव एका व्यक्ती ला एका वेळी असाच घेता येतो. उदा सिम्युलेटर्स
ऑग्मेंटेड रिॲलिटी मध्ये विशेष ॲप किंवा प्रोग्राम मध्ये आपण कॅमेरा तून एखादी गोष्ट पाहत असतो त्याच वेळी तंत्रज्ञानाच्या साहयाने नसलेली एखादी गोष्ट ही आभासी दाखवता येते. उदा आपण AR या ॲप मधून बालभारती 1 लीच्या पूस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले तर त्यावरील मल्टीमेडीया कंटेंट दिसायला लागेल( हा अनुभव रणजीतसिंह दिसले यांनी तयार केलेला आहे)
म्हणजेच रियल जग व आभासी जग अशी गुंफण ऑग्मेंटेड रिॲलिटीमध्ये केलेली दिसून येते.
अशी अनेक प्रकारची ॲप आज अँड्रॉईड स्टोअर ला उपलब्ध आहेत.
प्ले स्टोअर ला Virtual Reality सर्च केल्यास गुगल कार्डबोर्ड संबंधीत ॲप दिसून येतील तसेच युटयूब ला 360 नावाचे चॅनेल Virtual reality व्हीडीओज साठी आहे.  त्यासाठी तुमचा फोन व कार्डबोर्ड नावाचे डीव्हाईस लागेल जे ऑनलाईन 250 रु. पर्यंत मिळते.
ऑगमेंटेड रिॲलिटीसाठी
LAYAR
Blipper
Aurasma
Augment
अशी अनेक ॲप्स आहेत.
यातील बऱयाच  ॲप्स मध्ये आपल्याला स्वत: कंटेंट तयार ही करता येते.
तेव्हा ही भन्नाट ॲप्स वापरुन पहायला विसरू नका .

Mnemosyne

mnemosyne_logo_0
सुप्रभात मित्रांनो,
आज आपण एका नवीन सॉफटवेअर ची ओळख करुन घेणार आहोत. आपण सध्या रचनावादासाठी बरेच साहित्य बनवत आहोत. या साहित्याला जोडतंत्रज्ञानाचा वापर करता आला तर,
असे एक सॉफटवेअर नेमोसाईन (Mnemosyne)आहे.
खाली दिलेल्या लिंक वरुन हे ओपन सोर्स सॉफटवेअर डाऊनलोड करुन घ्या. यात आपल्याला फलॅशकार्ड बनवता येतात तसेच त्यांचे व्यवस्थापन ही सोपे होते. हे कार्डस बनविताना आपल्याला त्यात इमेज, व्हीडीओ, फलॅश ॲलिमेशन इत्यादी त्यात टाकता येतात. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचे म्हणजे ही कार्ड वाचताना त्या कार्डचे रँकींग आपल्याला करता येते. त्यानुसार कार्ड सोप्या  पासून कठीणाकडे अशा पध्दतीने डीस्प्ले होत राहतात. यात मराठी युनिकोड टाईप करण्यासाठी आपल्याला सेटींग्ज मध्ये जावून फॉन्ट व फॉन्ट साईज मोठी करुन घ्यावी लागेल.
या प्रोग्रामची खासियत म्हणजे हे सॉफटवेअर अतिशय सुटसुटीत असून त्यावर आपणाला आपली प्रगती ही दिवसानुसार कळून येते.
अशी अजूनही सॉफटवेअर्स असतील पण हे ओपन सोर्स सॉफटवेअर असल्याने मराठीत ही भाषांतर करता येईल
पुढच्या वेळी अजून नवीन ओपन सोर्स सॉफटवेअर्स जाणून घेवूयात.
तोपर्यंत
Happy Learning !
———————————
http://mnemosyne-proj.org/download-mnemosyne.php
फलॅशकार्ड साठी अँड्रॉईड प्ले स्टोअर वर Ankidroid हे ॲप उपलब्ध आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.ichi2.anki&hl=en



Anatomy4D

anatomy4d
मित्रांनो आज आपण पाहुयात एक भन्नाट मोबाईल ॲप Anatomy4D
ऑगमेंटेड रिॲलिटी वर आधारीत हे ॲप मानवी शरीरातील विविध संस्था शिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त व मनोरंजक आहे. आता ऑगमेंटेड रिॲलिटी हा शब्द ऐकला तर हे तंत्रज्ञान खूप खर्चिक असेल किंवा किचकट तरी असेल असे वाटेल पण या साठी आपल्याला आपल्या अँड्रॉईड फोन वर फक्त हे ॲप इन्स्टॉल करा. आणि वेबसाईट वर दिलेल्या मार्कर इमेज प्रिंट करुन घ्या. या इमेजेस आपल्याला ॲप मधूनही डाऊनलोड करता येतील.
आता कागद टेबल वर ठेवून ॲप सुरु करा त्यात कॅमेरा सुरु होईल. कॅमेऱ्या मधून मार्कर इमेज वर फोकस केले की लगेच आपल्याला फोन मध्ये मानवी शरीर 3 डी स्वरुवात दिसू लागेल. यात वेगवेगळया संस्था जसे, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, इ. आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर हार्ट च्या मार्कर वर फोकसे केले तर मानवी हृदय अगदी धडकताना 3डी रुपात दिसेत . यातही हृदयाचे वेगवेगळे भाग पाहता येतील.
तेव्हा नक्की डाऊनलोड करुन पहाच
Anatomy4D या नावाने गुगल प्ले स्टोअर वर सर्च करा …
Happy Learning…..


Edpuzzle

expuzzle
मित्रांनो नेट वर सर्च करताना बरेचसे व्हीडीओ आपल्याला आपल्या वर्गात वापरावे वाटतात. पण प्रश्न योतो तो भाषेचा. बहुतांश युटयूब वरील व्हिडीओ हे इंग्रजीत असल्याने आपल्या वर्गात आपल्याला शिकवताना परत एकदा मराठीतून सांगावे लागतात. हेच व्हिडीओ आपल्याला सोप्या रीतीने आपल्या भाषेत डब करता आले तर ?
आज अशाच एका साईटची ओळख आपण करून घेऊत.
https://edpuzzle.com/
Edpuzzle ही साईट आपल्याला युटयूब वरील किंवा इंटरनेटवरील कुठलेही व्हीडीओ आपल्यश आवाजात , भाषेत डब करण्याची सोय उपलब्ध करुन देते. या साईट वर गेल्यावर प्रथम आपल्याला टीचर म्हणून रजिष्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर आपण निवडलेल्या कुठल्याही ऑनलाईन व्हीडीओ ला सिलेक्ट केले की तो व्हीडीओ आपल्याला स्क्रीन वर दिसेल तो व्ळीडीओ पूर्ण जर आपल्याला वारायचा नयेल तर हवा तेवढा भाग आपण क्रॉप करुन वापरू शकतो. त्यानंतर येतो तो ऑडीओ रेकॉर्डींग चा भाग. या टॅब वर आपल्याला व्हीडीओ सूरू असताना आपल्या आवाजात आपल्या भाषेत ऑडीओ ओव्हरले करता येईल.
त्यानंतरची टॅब ही ऑडीओ नोट ची आहे खाली दिलेल्या पिवळया मार्कर वर क्लिक करुन आपल्याला व्हीडीओ पॉज करुन एखादा घटक समजावून सांगता येईल. असे कितीही ऑडीओ मार्कर आपणाला टाकता येतात.
व्हीडीओ सुरू असताना किंवा झाल्यावर आपल्याला हा घटक कितपत समजलाय यासाठी क्विज ही यात टाकता येते. त्यासाठी यात शेवटची टॅब दिलेली आहे. या क्विज च्याच जागी आपणाला फोटो सुघ्दा टाकता येईल तसेच इंटरनेट ची लिंक ही शेअर करता येईल.
सर्व झाल्यावर सेव्ह व फिनिश म्हणा.
आपला व्हीडीओ तयार आहे.
हा व्हीडीओ शेअर करण्यासाठी एक लिंक आपणास मिळेल त्याच बरोबर ब्लॉग, वेबसाईट वर टाकण्यासाठी एम्बेड कोड ही आपल्याला इथे कॉपी करता येतो.
नक्की ट्राय करा
Happy Learning !

जुमला

joomla
नमस्कार मित्रांनो,
आपणा सर्वांचे ब्लॉग असतीलच, पण स्वत:ची वेबसाईट तयार करण्याचे सर्वांचेच स्वप्न असते. वेबसाईट तयार करण्यासाठी आपणाला बरीच कोडींग करावी लागेल, खूप किचकट काम आहे असे आपल्याला वाटत असेल पण आज नेटवर बऱ्याच कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम उपलब्ध आहेत. ज्याव्दारे आपणाला डायनॅमिक वेबसाईट बनविणे अगदी सोपे आहे. यापैकीच एक लोकप्रिय सिस्टीम आहे जुमला 3, ही प्रणाली पूर्णपणे मोफत उपलब्ध असून आपणाकडे डोमेन नेम व सर्वस स्पेस असेल तर आपण आपली साईट थोडयाशा प्रयत्नाने सुरू करु शकता. तर या जुमला 3 या प्रणालीसंबंधी टयूटोरीयल ची प्लेलिस्ट ची लिंक सोबत देत आहे.
आपले प्रयत्न , थोडीशी चिकाटी आणि संयम ठेवलात तर आपण फार थोडया काळात ही प्रणाली वापरून डायनॅमिक साईटस तयार करु शकता.
अडचण आलीच तर गुगल आहेच की मदतीला ,
नक्की बघा
Happy Learning !

गुगल कार्डबोर्ड

ऑक्युलस रिफ्ट नाव ऐकलंय ? 3डी मुव्हीज, गेम्स मध्ये हे गॅजेट खूप धमाल करतंय. यात डोळयावर लावण्याच्या गॉगल्स प्रमाणे लेन्स व त्यापुढे छोटी स्क्रीन असा हा सेट अप असतो. या ऑक्यूलस रीफ्ट ची किंमत साधारण 2 लाखांपर्यंत आहे. याच बरोबर आणखी 3डी साठीचे गॅजेट पाहीले तरी साधारण 30 हजारांपासून किंमती सुरू होतात. यात सॅमसंग, एच टी सी, मायक्रोसॉफ्ट अशा मोठमोठया कंपन्यांचे प्रोडक्ट मार्केट ला उपलब्ध आहेत.
या सर्वात सारखेपणा एक म्हणजे हे तंत्रज्ञान तुलनेने नवीन असल्याने अजून यांच्या किंमती खूप जास्त आहेत. आणि वर्गात शिकविण्यासाठी पण हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरेल पण याची किंमत पाहता हा वापर करणे जवळ जवळ अशक्यच आहे.
यावर पर्याय काय ?
तर गूगल कार्डबोर्ड. स्मार्ट फोन चा वापर जवळपास बरेच जण करतात. याच स्मार्ट फोन ला पर्सनल 3डी व्हयूअर मध्ये बदलता आले तर ? ते ही फुकटात. आश्चर्य वाटले ना ? हो अगदी फुकट या स्मार्टफोन ला आपण 3 डी व्हयूअर मध्ये बदलू शकतो. यासाठी गुगल कार्डबोर्ड आपल्या मदतीला येईल. गुगल ने अँड्रॉईड फोन ला स्टीरीओस्कोपिक 3 डी व्हयूअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे डिव्हाईस बनवलस . काय आहे गुगल कार्डबोर्ड? तर साध्या कोरुगेटेड बॉक्स च्या पुठठयापासून एक छोटा बॉक्स मोबाईल बसेल असा बनवायचा. सोबत लागतील दोन बहिर्वक्र भिंग 5x पॉवर असणारे. या भिंगांची फोकर लेंथ मोजून घ्या. हे अंतर तेवढे आहे ज्या अंतरावर या भिंगांनी सूर्यकिरण एका बिंदूत सामावले जातात. तेवढे अंतर मोजून घ्या.
मोबाईल बॉक्स मध्ये ठेवल्यावर मोबाईल च्या स्क्रीन पासून लेन्स चे अंतर फोकल लेन्थ एवढे असावे. यानंतर थोडासा किचकट भाग आहे. या दोन भिंगांमधले अंतर हे आपल्या दोन डोळयांच्या बाहुली च्या अंतराएवढे असावे. साधारण दोन भिंगांमधे 6.5 सेमी अंतर असावे. भिंगे लावताना हे अंतर थोडे कमी जास्त करण्यासाठी जागा ठेवा. नाकाच्या जागी बॉक्स ला तेवढी खाच पाडून घ्या.
आपला 3 डी व्हयूअर तयार झाला. आता मोबाईल मध्ये गुगल कार्डबोर्ड हे अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. मोबाईल बॉक्स मध्ये ठेऊन दोन्ही डोळयांनी भिंगांमधून पहा. सॅम्पल इमेज 3 डी मध्ये दिसायला लागेल. स्पष्ट दिसत नसेल तर लेन्स ची थोडी ॲडजस्टमेंट करा. स्पष्ट इमेज दिसायला लागली तेथे लेन्स फिक्स करून घ्या.
प्ले स्टोअर वर Cardboard नावाने सर्च केल्यास खूप सारी अप्लीकेशन्स मिळतील. त्याचबरोबर यु टयूब वर Side by Side 3 D या नावाने सर्च केल्याच भरपूर 3 डी व्हीडीओ आपल्याला मिळतील. हे सारे व्हीडीओ आपण यावर पाहू शकतो.
साईड बाय साईड व्हीडीओ मध्ये आपल्याला स्क्रिन वर दोन चित्रे दिसतात. 3 डी व्हयूअर मध्ये दोन डोळयांना दोन वेगवेगळे चित्रे दिसत असतात. या इमेजेस मध्ये थोडा फरक असतो. दोन्ही डोळयांना वेगवेगळे चित्र जरी दिसत असले तरी मानवी मेंदू त्या इमेजेस ला एकत्र करतो. यातून चित्राला खोली असल्याचा भास आपल्याला होतो.
हे कार्डबोर्ड आपल्याला रेडीमेड विकत घ्यायचे असल्यास इ बे सारख्या ऑनलाईन साईट वर 250 ते 300 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत उपलबध आहेत.
चला तर मग स्मार्ट फोन चा आणखी एक स्मार्ट वापर करुयात ….
गुगल कार्डबोर्ड
https://www.google.com/get/cardboard/
रेडीमेड व्हयूअर
http://goo.gl/pOf1rI
टेम्प्लेट
http://goo.gl/iom2s1
लेन्स
http://goo.gl/aATbo3

अनिल सोनुने
Microsoft Innovative Educator Expert
प्रा.शा.निमखेडा
जालना