Pages

Monday 7 March 2016

गुगल कार्डबोर्ड

ऑक्युलस रिफ्ट नाव ऐकलंय ? 3डी मुव्हीज, गेम्स मध्ये हे गॅजेट खूप धमाल करतंय. यात डोळयावर लावण्याच्या गॉगल्स प्रमाणे लेन्स व त्यापुढे छोटी स्क्रीन असा हा सेट अप असतो. या ऑक्यूलस रीफ्ट ची किंमत साधारण 2 लाखांपर्यंत आहे. याच बरोबर आणखी 3डी साठीचे गॅजेट पाहीले तरी साधारण 30 हजारांपासून किंमती सुरू होतात. यात सॅमसंग, एच टी सी, मायक्रोसॉफ्ट अशा मोठमोठया कंपन्यांचे प्रोडक्ट मार्केट ला उपलब्ध आहेत.
या सर्वात सारखेपणा एक म्हणजे हे तंत्रज्ञान तुलनेने नवीन असल्याने अजून यांच्या किंमती खूप जास्त आहेत. आणि वर्गात शिकविण्यासाठी पण हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरेल पण याची किंमत पाहता हा वापर करणे जवळ जवळ अशक्यच आहे.
यावर पर्याय काय ?
तर गूगल कार्डबोर्ड. स्मार्ट फोन चा वापर जवळपास बरेच जण करतात. याच स्मार्ट फोन ला पर्सनल 3डी व्हयूअर मध्ये बदलता आले तर ? ते ही फुकटात. आश्चर्य वाटले ना ? हो अगदी फुकट या स्मार्टफोन ला आपण 3 डी व्हयूअर मध्ये बदलू शकतो. यासाठी गुगल कार्डबोर्ड आपल्या मदतीला येईल. गुगल ने अँड्रॉईड फोन ला स्टीरीओस्कोपिक 3 डी व्हयूअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे डिव्हाईस बनवलस . काय आहे गुगल कार्डबोर्ड? तर साध्या कोरुगेटेड बॉक्स च्या पुठठयापासून एक छोटा बॉक्स मोबाईल बसेल असा बनवायचा. सोबत लागतील दोन बहिर्वक्र भिंग 5x पॉवर असणारे. या भिंगांची फोकर लेंथ मोजून घ्या. हे अंतर तेवढे आहे ज्या अंतरावर या भिंगांनी सूर्यकिरण एका बिंदूत सामावले जातात. तेवढे अंतर मोजून घ्या.
मोबाईल बॉक्स मध्ये ठेवल्यावर मोबाईल च्या स्क्रीन पासून लेन्स चे अंतर फोकल लेन्थ एवढे असावे. यानंतर थोडासा किचकट भाग आहे. या दोन भिंगांमधले अंतर हे आपल्या दोन डोळयांच्या बाहुली च्या अंतराएवढे असावे. साधारण दोन भिंगांमधे 6.5 सेमी अंतर असावे. भिंगे लावताना हे अंतर थोडे कमी जास्त करण्यासाठी जागा ठेवा. नाकाच्या जागी बॉक्स ला तेवढी खाच पाडून घ्या.
आपला 3 डी व्हयूअर तयार झाला. आता मोबाईल मध्ये गुगल कार्डबोर्ड हे अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. मोबाईल बॉक्स मध्ये ठेऊन दोन्ही डोळयांनी भिंगांमधून पहा. सॅम्पल इमेज 3 डी मध्ये दिसायला लागेल. स्पष्ट दिसत नसेल तर लेन्स ची थोडी ॲडजस्टमेंट करा. स्पष्ट इमेज दिसायला लागली तेथे लेन्स फिक्स करून घ्या.
प्ले स्टोअर वर Cardboard नावाने सर्च केल्यास खूप सारी अप्लीकेशन्स मिळतील. त्याचबरोबर यु टयूब वर Side by Side 3 D या नावाने सर्च केल्याच भरपूर 3 डी व्हीडीओ आपल्याला मिळतील. हे सारे व्हीडीओ आपण यावर पाहू शकतो.
साईड बाय साईड व्हीडीओ मध्ये आपल्याला स्क्रिन वर दोन चित्रे दिसतात. 3 डी व्हयूअर मध्ये दोन डोळयांना दोन वेगवेगळे चित्रे दिसत असतात. या इमेजेस मध्ये थोडा फरक असतो. दोन्ही डोळयांना वेगवेगळे चित्र जरी दिसत असले तरी मानवी मेंदू त्या इमेजेस ला एकत्र करतो. यातून चित्राला खोली असल्याचा भास आपल्याला होतो.
हे कार्डबोर्ड आपल्याला रेडीमेड विकत घ्यायचे असल्यास इ बे सारख्या ऑनलाईन साईट वर 250 ते 300 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत उपलबध आहेत.
चला तर मग स्मार्ट फोन चा आणखी एक स्मार्ट वापर करुयात ….
गुगल कार्डबोर्ड
https://www.google.com/get/cardboard/
रेडीमेड व्हयूअर
http://goo.gl/pOf1rI
टेम्प्लेट
http://goo.gl/iom2s1
लेन्स
http://goo.gl/aATbo3

अनिल सोनुने
Microsoft Innovative Educator Expert
प्रा.शा.निमखेडा
जालना

No comments:

Post a Comment