Pages

Monday 7 March 2016

टीव्ही व्हाईट स्पेस इंटरनेट

आजच्या काळात स्मार्टफोन हे एक सहज उपलब्ध असलेले महत्वाचे साधन झाले आहे. हाताच्या तळव्यावर सामावण्याऱ्या या साधनाची ताकद ही संगणकाऐवढीच किंवा उपयोगिता ही काकणभर सरसच आहे. या स्मार्टफोनचा वापर आपण सगळे रोजची कामे अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी करत असतो. मग एक शिक्षक्‍ म्हणून वापर करताना मी त्याचा वापर स्वत:च्या वर्गात विद्यार्थ्यांना समृध्द करण्यासाठी किंवा स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी मी करत असतो. हे वापरत असताना एक महत्वाची अडचण नेहमी जाणवते ती म्हणजे स्लो इंटरनेट स्पीड किंवा इंटरनेट साठी कव्हरेज न मिळणे. आपल्या जिल्हा परीषद शाळा या वाडया वस्त्यांवरुन विखुरलेल्या आहेत. या त्याच बरोबर प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परीस्थिती ही वेगळी आहे. ज्यामुळे शासकिय पातळीवर इंटरनेट सुविधेने सर्व शाळा जोडणे हे जिकिरीचे काम झालेले आहे.
सद्यस्थितीत उपलब्ध पर्याय विचारात घेता मोबाईल इंटरनेट व ब्रॉडबँड कनेक्शन हे दोन पर्याय आपल्यापुढे आहेत. यातील मोबाईल इंटरनेट लक्षात घेतले तर 3 जी नेटवर्क साठी जे काय दर आकारले जातात ते वैयक्तिक सेवा धारकाला परवडतील परंतु शाळेसारख्या आस्थापनाला परवडणारे नाही. त्याच बरोबर बीएसएनएल सारख्या सेवाधारकांची सेवा ही सुदधा अजूनही ग्रामिण भागामधे पोचलेली नाही. लास्ट माईल पर्यंत ही सेवा पोचायला बऱ्याच अडचणी आहेत.
अशा वेळी एक पर्याय आपणा पुढे आहे तो म्हणजे वेगवान इंटरनेट जिथपर्यंत उपलबध आहे तिथून केबलव्दारे शाळेपर्यंत घेणे. यातही बऱ्याच अडचणी आहेत.यात जोडणीचा खर्च तसेच देखभाल व सुरक्षा हे महत्वाचे मुद्ये येतात.
एक पर्याय म्हणून लाँग रेंज वाय फाय नेटवर्क पाहता येईल पण त्यातील महत्वाची अडचण म्हणजे त्यासाठी दोन्ही ठिकाणे ही Line of Site मध्ये असावी लागतात. त्याच बरोबर Wifi च्या Frequencies या भिंती , बांधकाम, झाडे यांच्यामधून जाऊ शकत नाहीत. त्यांच्या कार्यक्षमतेवर परीणाम होतो.
मग पर्याय म्हणून काय उपलब्ध आहे तर टी व्ही व्हाईट स्पेस.
काय आहे टीव्ही व्हाईट स्पेस ?

आपण सर्वांनी दूरदर्शन चे चॅनेल पाहिलेले आहेत जे प्रक्षेपण आपण घरावर लावलेल्या एका Antenna च्या साहयाने पाहू शकतेा. अशा चॅनेल्स ची संख्या एका वेळी दोन किंवा तीन पेक्षा जास्त नाही. बाकी चा जो स्पेक्ट्रम या प्रक्षेपणा साठी उपलब्ध आहे तो खरं म्हणजे वाया जातो असंच म्हणावं लागेल. हा स्पेक्ट्रम थोडा नाही तर भारतात 470 मेगाहर्टझ ते 585 मेगाहर्टझ एवढा उपलब्ध आहे. या स्पेक्ट्रम मधील वापर होत असलेली बँड फक्त 7 मेगाहर्टझ ते 10 मेगाहर्टझ्‍ एवढा आहे. म्हणजे आपणाकडे हा पूर्ण स्पेक्ट्रम हाय स्पीड इंटरनेट सेवेसाठी उपलब्ध करुन घेता येईल.
जगभरात या संदर्भात संशोधन व कार्य सुरु आहे. भारतात बेंगलोर ची कंपनी Sankhya Labs ने या तंत्रज्ञानावर आधारीत चिप पृथ्वी ही चिप डेव्हलप केली आहे. या तंत्रज्ञानाचा हा की या व्दारे 10 किमी पर्यंत इंटरनेट सेवा बेस स्टेशन पासून कमीत कमी दरात खेडोपाडी पण देता येऊ शकते.
या तंत्रज्ञानावर आधारीत सिस्टम जर शासनाने राबवायची ठरवली तर केंद्र शाळेला हाय स्पीड इंटरनेट सेवा देऊन तेथून ही सेवा बाकी शाळांवर वापरता येईल. यासाठी बेस स्टेशन एक असेल व बाकी च्या शाळा या रीसीवर्स असतील. या तंत्राज्ञानाने 2 MBPS पर्यंत हाय स्पीड इंटरनेट सेवा कमी खर्चात शाळांपर्यंत पोचविणे शक्य होईल. सदरील तंत्रज्ञान हे अतिशय स्वस्तात उपलबध असल्याने तसेच हे नेटवर्क वायरलेय असल्याने देखभाल तसेच दुरुस्तीचा खर्च ही नगन्य राहील. केवळ शाळाच नाही तर सर्व शासकिय आस्थापने या सेवेव्दारे शासनाला या नेटवर्क वर जोडता येणे शक्य होईल. सध्या तरी या तंत्रज्ञानावर आधारीत काही पायलट प्रकल्प भारतात सुरु आहेत. यात मायक्रोसॉफट व्दारे सुरू असलेला आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम येथील प्रकल्प , IIT मुंबई येथील प्रकल्प असे काही उदा. देता येतील.
शासनाने या नवीन तंत्राचा वापर करुन नक्कीच Digital India च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे असे वाटते.
अनिल सोनुने
प्राथमिक शिक्षक
प्रा.शा. निमखेडा खुर्द

No comments:

Post a Comment